‘आकांक्षा’ मासिकाची ई-बुकपर्यंत भरारी

महाराष्ट्रातील मोजक्याच महिला प्रकाशकांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या अरुणा सबाने यांच्या ‘आकांक्षा’ मासिकाने ई-बुकपर्यंत भरारी घेतली आहे. अरुणा सबाने यांचे आकांक्षा प्रकाशन आता डिजिटल झाले आहे. पुढे वाचा »

दखल : जिवाभावाचे

प्रत्येकाच्याच आयुष्यात कुणी ना कुणी येतं, जे कधी संस्कार करून जातं तर कधी मनावर कायमचा ठसा उमटवून जातं. सांगायचं तात्पर्य हेच की, आपण जे आयुष्य जगतोय किंबहुना, ज्या पद्धतीनं जगतोय, पुढे वाचा »

‘आकांक्षा’ मासिकाच्या शंभराव्या अंकाचे प्रकाशन

‘आकांक्षा’ हे मासिक राहिले नसून चळवळ झाली असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सीमाताई साखरे यांनी काढले. अरुणा सबाने संपादित ‘आकांक्षा’ या मासिकाचा तेरावा वर्धापनदिन पुढे वाचा »

 

स्वगृह

नाव : अरुणा पंजाबराव सबाने
जन्म : २९ मे १९५९
पत्ता : ए-५०६, गणेश-गौरी अपार्टमेंट
गुमास्ता ले-आऊट, कोतवाल नगर, नागपूर-१५
दूरध्वनी : (०७१२)-२२४७८८४, ९९७००९५५६२.

संपादक : आकांक्षा मासिक

संचालक :आकांक्षा प्रकाशन

स्तंभलेखन : लोकमत, नवराष्ट्र, जनवाद, निर्मल महाराष्ट्र, बायजा, स्त्री, मिळून साऱ्याजणी इ.

सचिव :

दलित मानवधिकार समिती, बंगलोर
पूर्णा खोरे मित्र मंडळ, अकोला

संपादक : दै. निर्मल महाराष्ट्र, नागपूर-२००२-०३
संचालक : आकांक्षा वाचनालय

आशा भोसले

कार्यकारी सदस्य :

  • इंडिया वाटर पार्टनरशिप, दिल्ली (आंतरराष्ट्रीय संस्था)
  • अखिल भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबाद

मुख्य आयोजन : पहिले अखिल भारतीय जल साहित्य सम्मेलन २००१

सहभाग (पेपर वाचन) :

  • जपान, नेपाळ, बँकॉक, दिल्ली, कोकण, हैद्राबाद, बंगलोर, भुवनेश्वर, पटियाला, आनंद (गुजरात), अहमदाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, बीड, म्हैसूर, जयपूर, नांदेड, नागपूर, दूरदर्शन, मुलाखती
  • आकाशवाणी १०० च्या वर talk
  • १५ नभोनाट्य

प्रकाशित पुस्तके

  • १] जखम मनावरची
  • २] अथांग
  • ३] स्त्री नाते स्वतःशी
  • ४] अनुबंध
  • ५] आईचा बॉयफ्रेंड
  • ६] विमुक्ता
  • ७] मुन्नी
  • ८] बहिणाबाई चौधरी
  • ९] आंबेडकर आणि स्त्री
  • १०] साहित्यातून समाजाकडे
  • ११] स्त्रीवाद :एक दृष्टिक्षेप
  • १२] जिवाभावाचे
  • १३] आक्रोश: सामाजिकतेचा
  • १४] अनप्लॅन्ड ट्रिप [आगामी]

सन्मान

  • पतंगराव कदम फाउंडेशन[ जखम मनावरची] कोल्हापूर १९९४
  • बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार [लातूर ] २००१
  • गंगाधर अधिकारी वंचित मित्र मित्र पुरस्कार, पुणे २०००
  • स्मिता पाटील सामाजिक पुरस्कार २००२
  • सावित्रीबाई फुले पुरस्कार २००४
  • राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार २००५ मुंबई
  • अ भा. मराठी पत्रकार परिषद राज्यस्तरीय उत्कृष्ठ दिवाळी अंक पुरस्कार २००६
  • कस्तुरबा गांधी सामाजिक पुरस्कार २००७
  • मैत्री पुरस्कार २००७
  • इंदुमती शेवडे मराठी साहित्य पुरस्कार २००९
  • रुक्मिणी पुरस्कार- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक २००९
  • समाजप्रबोधन, नागपूर राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रथम पुरस्कार
  • सर्वोतृष्ट साहित्य पुरस्कार स्त्री नाते स्वतःशी ला २००३
  • उत्कृष्ठ कथासंग्रह पुरस्कार अनुबंध २००४
  • विमुक्ता:
    • राज्यस्तरीय साहित्य साधना स्त्रीवादी साहित्य पुरस्कार २००६
    • उद्धव शेळके पुरस्कार, अंकुर साहित्य संमेलन २००६
    • जनसंवाद साहित्य पुरस्कार, नांदेड,२००७
    • ना.हा. आपटे कादंबरी पुरस्कार, सांगली, २००७
  • मुन्नी
    • प्र. के .अत्रे पुरस्कार, पुणे२०११
    • समाजप्रबोधन, नागपूर सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार २०११
    • पदमगंध प्रतिष्ठान मालिनी बोबडे सामाजिक कार्य पुरस्कार, २०१६
    • मातृगौरव पुरस्कार रोटरी क्लब, मुंबई २०१५
    • यशवंतराव चव्हाण सामाजिक कार्य गौरव पुरस्कार, २०१७
    • यशवंतराव दाते स्मृती संस्था वर्धा तर्फे हरीश मोकळवर सामाजिक कार्य ऋण पुरस्कार २०१९
    • स्त्रीप्रतिष्ठा साहित्यिक सन्मान पुरस्कार २०१९, सांगली

विशेष

  • आता पर्यंत ५ विद्यार्थ्यांनी साहित्य आणि व्यक्तिमत्व अशा अंगाने वेगवेगळ्या विषयांवर पीएचडी केली.
  • विदर्भ साहित्य संघ महिला साहित्य संमेलन अध्यक्ष
  • बी.ए.प्रथम वर्षाला धडा

विशेष कार्य

  • पहिले अखिल भारतीय जल साहित्य संमेलनाचे नागपूर येथे आयोजन२००२
  • पाणी वाचावा: पाणी जिरवा , जल साक्षरता या अभियानासाठी महाराष्ट्रभर सतत डावरे.
  • पाणी विषयावर पेपर रिडींग साठी जपान, नेपाळ स्वीडन, स्टोकहोम, येथील कार्यशाळांमधून पेपर वाचन .

सामाजिक कार्य

  • गरजू, अनाथ मुलांचे शिक्षण
  • कौटुंबिक सल्ला केंद्र.
  • ३ सेक्स वर्कर्स चे पुनरुत्थान
  • ५००० परित्यक्त स्त्रियांचा अभ्यास करून मुख्यमंत्रांकडे त्यांच्या पोटगीषे गार्हाणे मांडले. ५००रू. ची पोटगी १५०० वर नेली २००४

सदस्य

  • महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती, पुणे २०१४ ते २०१९
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नागपूर
  • कार्यकारी सदस्य: इंडिया वॉटर पार्टनरशिप दिल्ली
  • अखिल भारतीय जलसंस्कृती मंडळ,औरंगाबाद
  • समन्वयक दक्षिणायन राष्ट्रीय कन्व्हेन्शन २०१८
  • प्रभावती सबाने सामाजिक कार्य पुरस्कार सुरुवात २०१९ पासून

अध्यक्षपदे

  • माहेर सामाजिक व शैक्षणिक संस्था ,नागपूर
  • महिला पाणी मंच .
  • भारत कृषक सम्ज २००२
  • युक्रांद विदर्भ, २००२ ते २०१०
  • प्रगतिशील लेखक संघ, नागपूर २००८ ते २०११

प्रशंसापत्र

अरुणा सबाने ह्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रास सर्वपरिचित आहे. महिला जागृती आणि जल जागृती हे त्यांचे दोन बालेकिल्ले आहेत.पण मुख्य म्हणजे त्या लेखीकाही आहे. जीवनाने जे कडू गोड अनुभव त्यांचा पदरात टाकले त्या अनुभवानेच त्यांना सामाजिक आणि वाड्मयीन भान दिले. अरुणा आणि आकांक्षा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक भूषण आहेत. अरुणा ह्या खेत्रात स्त्रीच्या समर्पण वृत्तीने व पुरुषी धडाडीने उतरली आहे, असे ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ट समीक्षक डॉ. द.भी.कुलकर्णी गौरवाने म्हणतात.