स्त्री संदर्भातील कार्य

 • विदर्भात पहिल्यांदा सावित्रीबाई फुले जयंतीची सुरुवात.
 • कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? या विषयावर जाणीव जागृतीसाठी विदर्भात विविध ठिकाणी ५५ कार्यशाळा.
 • कौटुंबिक सल्ला केंद्र.
 • ५ अनाथ मुलींचे लग्न.
 • ३ असहाय वृद्ध स्त्रियांची स्वतःसोबत राहण्याची व्यवस्था.
 • २ sex worker चे पुनरुत्थान.
 • Sex worker च्या एका मुलीला शिकवून आज ती स्वयंभू आहे.
 • एका अनाथ मुलीला शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकाचे बाप म्हणून नाव मिळवून दिले.
 • ‘स्त्री-पुरुष समान’ हा विचार समाजाच्या मनावर बिंबावा यासाठी शेकडो लेख.
 • भारतभर ओवाख्यान दौरे.
 • स्त्री अत्याचार पिडीत स्त्रियांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्नशील.
 • अनेक मोर्च्यांमध्ये सहभाग.
 • ५००० परित्यक्त स्त्रियांचा अभ्यास करून मुख्यमंत्र्याकडे त्यांच्या पोटगीचे गाऱ्हाणे सातत्याने मांडले.
 • ५०० रु. ची पोटगी १५०० रु. वर नेली.
 • समाजकल्याण मंत्र्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन आश्रमशाळेची व वृद्धांसाठी ३५० रु. दरडोई असलेला भत्ता ५०० रु. दरडोई करवला.
 • लग्नानंतरच्या पहिल्या पाच वर्षातल्या १७ मुलींना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त केले.
 • आकांक्षा फ्रेंड्स क्लबतर्फे ज्या अल्पभूधारक (परित्यक्त, विधवा) स्त्रीच्या भरवशावर तिचे कुटुंब आहे आशा
 • ग्रामीण भागातल्या स्त्रीला ५००० रु. आणि सन्मान चिन्ह जून बहिणी चौधरी पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्याचा उपक्रम १५ नोव्हेंबर २००८ पासून सुरु केला.
 • नागपूर भांडेवाडी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करणाऱ्यास अटक करवण्यात यश.
 • भंडारा जिल्ह्यातील कोटगाव येथील बलात्कारीत स्त्रीला न्याय व शासकीय यंत्रणेतून एक लाखाची मदत मिळून दिली.