विशेष कार्य

 • विदर्भातील एकमेव मासिक सातत्याने गेली बारा वर्षे चालविणे. महिलांच्या समस्यांना वाहिलेले आकांक्षा मासिक.
 • मासिकाद्वारे विविध विषयात सामाजिक कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींवरील, साहित्यिकांवरील विविध विषावरील विशेषाक सोबत सूची जोडली आहे.
 • विदर्भातील एकमेव महिला प्रकाशक.
 • केवळ आठ वर्षात ११५ पुस्तके प्रसिद्ध. यात महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या ख्यातनाम साहित्यिकांची पुस्तके समाविष्ट.
 • २५ अनाथ मुलांचा शिक्षणाची जवाबदारी स्वीकारली (Education Parent ship) सोबत आवाहन जोडले गेले.
 • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न.
 • ‘जल साहित्य संमेलन’ या शब्दाची निर्मिती.
 • पहिले अखिल भारतीय जल साहित्य संमेलनाचे नागपूर येथे आयोजन
 • ‘पाणी वाचवा पाणी जिरवा’, ‘जल साक्षरता’ या अभियानासाठी महाराष्ट्रभर सतत दौरे करून महिला पाणी मंचच्या १०० च्या वर शाखा.
 • वर्धा जिल्ह्यातील निमगांव तरुण मुलांच्या सहकार्याने गावासाठी पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी विहीर खोदण्याचा यशस्वी उपक्रम.
 • पाणी वाचविणाऱ्या विद्यार्थास वॉटर फ्रेंड पुरस्कार बहाल.
 • वर्धेला यशोदा खोरे मित्र मंडळ स्थापन करून शासकीय कर्मचारी. जिल्हाधिकारी, समाजसेवी संस्थांचे पदधिकारी, जागरूक नागरिक अशा विविध पातळीवरील लोकांच्या सहभागाने कार्यशाळा.
 • ३५ महाविद्यालयांमधून जवळजवळ १ लाख विद्यार्थ्यांसमोर जलसाक्षरता, पिण्याचे महत्त्व, पाणी नियोजन, अशा विविध विषयांवर भाषणे.
 • पाणी बचत पुस्तकांचे दरवर्षी शाळांमधून वाटप.
 • पाणी विषयावरील कार्यामुळे नेपाल, स्टॉकहोम, जपान येथे विशेष भाषण.
 • महाराष्ट्रातल्या विविध दैनिकांमधून जलजागृतीबद्दलचे लेखन.
 • पाणी संदर्भातील कामामुळे नागपूर महानगरपालिकेचा ‘जलमित्र गौरव पुरस्कार’.
 • सुमेरू प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘महाराष्ट्रातील जलनायक’ या पुस्तकात कामाचा समावेश. २००७
 • नाशिक येथील अभिव्यक्ती मिडिया सेंटरने प्रकाशित केलेल्या ‘मध्यमरंगी’ या पुस्तकात कार्यावर फोकस टाळणारा लेख मार्च-२०१०.
 • सकाळ मेट्रो पुरवणीत (मुंबई) सामाजिक कार्याची दखल घेणारा लेख २००५.
 • द हिंदू न्यूज पेपर- मुलाखत २००३.
 • विदर्भातील सगळ्याच पपेर्समध्ये वेळोवेळी मुलाखती.